महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय…

0


मत्स्य व्यवसायाला मिळाला कृषीचा दर्जा…!!

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला- ऐतिहासिक निर्णय…!

मच्छीमार आणि मत्स्य व्यवसायिकांना होणार अनेक फायदे..!
१) शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना वीज दरात सवलत मिळेल.

२) किसान क्रेडीट कार्ड सुविधा उपलब्ध होईल.

३) कृषीदरानुसार कर्ज सहाय्य मिळण्यास मच्छीमार पात्र होतील.

४) मत्स्यशेतीस अल्प दरात विमा मिळेल.

५) शेतकऱ्यांप्रमाणे सौर उर्जेबाबतचे लाभ मिळतील.

६) नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अँक्वाकल्चर मत्स्यशेती करण्यासाठी मच्छीमार पात्र होतील.

७) शीतगृह सुविधेसाठी व बर्फ कारखान्यासाठी अनुदान मिळेल.

८) मत्स्यव्यवसाय क्षेत्रामध्ये नीलक्रांती घडेल व तरुणांना रोजगार मिळतील.

९) उपकरणे व यंत्रे सवलतीच्या दरात उपलब्ध होतील.

१०) सागरी व अंतर्गत मासेमारी क्षेत्रामध्ये आर्थिक विकास होईल.

११) मच्छीमारांना शासनातर्फे रिलीफ पॅकेज मिळणार.

१२) राज्याच्या मत्स्य उत्पादनामध्ये भरीव वाढ होणार.

१३) मच्छीमारांना मत्स्यबीज खरेदी, खाद्य खरेदी, पॅडलव्हील एअरेटर्स, एअरपंप करीता अनुदान मिळणार.

१४) नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळणार.

धन्यवाद, देवा भाऊ…!!

स्नेहांकित..

नितेश राणे
मंत्री, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्रालय, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *