
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
घाटकोपर पश्चिम हिमालय सोसायटी येथील सनग्रेस इंग्लिश स्कूल अँड जूनियर कॉलेजचा 10 वी आणि 12 वी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, पत्रकार प्रशांत बढे, विष्णू खराटे, एड निलिमा चव्हाण, उमाशंकर राजभर, हरिश्चंद्र पाठक आणि विद्यालयाचे संस्थापक भालचंद्र दळवी तसेच शिक्षक,पालक आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.