मुंबई, दि. १ : केंद्रीय संरक्षण व पर्यटन राज्यमंत्री अजय भट व राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी राष्ट्रीय छात्र सेना संचालनालयास भेट दिली.
यावेळी अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी, उपमहासंचालक ब्रिगेडियर एस. लाहिरी, ग्रुप कमांडर ब्रिगेडियर सी. मढवाल आदी उपस्थित होते.
केंद्रिय राज्यमंत्री श्री. भट व मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
केंद्रिय राज्यमंत्री श्री. भट म्हणाले की, विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्त ही महत्त्वाची आहे. मुली ही या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात येत आहेत हे कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम नागरिक बनून देशाची सेवा करावी, असे सांगत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.