गुरु तेग बहादूर वसाहतीच्या पुनर्विकासाच्या कामास गती देणार

0
dgipr.

            “मुंबईतील गुरु तेग बहादूर कॉलनीत शीख, पंजाबी, सिंधी समाज 70 ते 75 वर्षापासून राहतो. जुनी वसाहत असल्याने याठिकाणी बऱ्याच इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. या विभागातील इमारतींचा पुनर्विकास होणे गरजेचे आहे. त्याचं काम आपण लवकरच सुरू करणार असून या कामाला गती देण्यात येईल. शीख समुदायाने आतापर्यंत सहन केलेल्या त्रासातून बाहेर पडण्याची संधी या पुर्नविकासाच्या माध्यामातून मिळणार आहे”, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

            यावेळी खासदार मनोज कोटक,आमदार कॅप्टन.आर.तमिल सेल्वन ,मिहीर कोटेचा,सरदार तारासिंग,सरदार मनमोहनसिंग यांच्यासह शिख समुदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी उपमुख्यमंत्री यांना परपंरेनुसार पगडी बांधण्यात आली व गुरू नानक यांच्या जयंतीनिमित्त निमित्त गुरुग्रंथसाहेबचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *