



मुंबई- बेस्टचे माजी अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांनी गेल्या काही दिवसांपासुन मुंबई महापालिकेच्या माध्यमातून चेंबूरच्या घाटले परिसरात मान्सूनपूर्व विविध विकास कामांची जणू रेलचेल सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून पाटणकर यांच्या प्रयत्नाने पालिकेच्या जल विभागाच्यावतीने नुकताच नाना चौक ते उत्तम सोसायटीपर्यंत ६ ईंच पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी भूमिपूजन कार्यक्रम पार पाडला.
या भूमिपूजन प्रसंगी शाखाप्रमुख उमेश करकेरा, महिला शाखा संघटीका योगिता म्हात्रे,समाजसेविका मिनाक्षी अनिल पाटणकर, घाटले ग्राम आगरी समाज ट्रस्ट, ज्येष्ठ शिवसैनिक कृष्णा पाटील, उपशाखा प्रमुख राजेंद्र पाटील, युवासेना चेंबूर विधानसभा समन्वयक गणेश गायकवाड,युवासेना उपविभाग अधिकारी विनय साठले, युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला,पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.गेल्या काही दिवसांपासून अनिल पाटणकर यांच्या प्रयत्नाने या परिसरात अमर नगर, मोतीबाग येथील उद्यानाची डागडुजी,घाटले गणेश विसर्जन तलाव नवीन प्रवेशद्वार उभारणी आणि सुशोभीकरण तसेच निमकर सोसायटी येथे गटार रुंदीकरण व स्लॅबचे काम आणि अनेक ठिकाणी लादीकरण कामे सुरू आहेत.विशेष म्हणजे ही कामे लवकर कशी पूर्ण होतील यासाठी या सर्व कामांची पाटणकर हे जातीने पाहणी करताना दिसत आहेत.