
मुंबई- कोरोना काळानंतर यंदाचा नवरात्र उत्सव प्रथमच सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.मुंबईही या उत्सवाने चांगलीच रंगत आणली आहे.अशातच चेंबूरचे एक मंडळ मात्र सामाजिक उपक्रम राबविण्यात मग्न दिसत आहे.चेंबूरच्या घाटले गाव परिसरातील अरविंद पाटील वाडीतील साईधाम रहिवासी मंडळातर्फे यंदाचा नवरात्रोत्सव मोठ्या जल्लोषात सुरू आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मंडळातर्फे परिसरातील नागरिकांसाठी नुकतेच मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला गरजू नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला.
या शिबिराचे उद्घाटन बेस्ट चे माजी अध्यक्ष आणि चेंबूरचे लोकप्रिय नगरसेवक अनिल पाटणकर,पोलीस निरीक्षक समाधान रिठे,प्रसिद्ध उद्योगपती आशिष गडकरी, समाजसेवक राजू नगराळे, समाजसेविका मीनाक्षी पाटणकर, सामाजिक कार्यकर्त्यां स्वाती पाटील तसेच लायन्स क्लब ऑफ चेंबूरचे लायन लक्ष्मण कनल,रोहिदास सावंत,
प्रवीण भल्ला,आरती ओबेरॉय यांच्या हस्ते पार पडले.या शिबिराला आमदार प्रकाश फातर्पेकर, विभाग प्रमुख अविनाश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष हजेरी लावली होती.शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष भास्कर चव्हाण यांच्यासह तानाजी गायकवाड,नवाकाळचे उपसंपादक शंकर कडव, रत्नाकर गुरव,सौरभ राणे,
चंद्रकांत पाटील,अनंत कोटकर,तुषार नवेले,प्रदीप कोटकर आणि दुर्गेश माटल आदी पदाधिकाऱ्यांनी सर्व सभासद तसेच साईधाम महिला मंडळाने विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल कदम यांनी केले.