

छत्रपती शिवाजी सेवा मंडळ हे चेंबुर विभागात नेहमी सामाजिक उपक्रम राबवीत असत. मागील 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी पासुन शिवजयंती निमित्ताने विविध किल्ल्यांवरून शिवज्योत आणुन किल्ल्यावर स्वच्छता मोहीम व विविध सामाजिक उपक्रम राबवीत असतो.
यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे 31 मार्च रोजी सकाळी 10 वाजल्यापासुन शिवाजी पार्क दादर आश्वरुढ शिवाजी महाराजांचा पुतळा , चैत्यभुमी ‘बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळ ,अण्णा भाऊ साठे उद्यान सुमन नगर , नारायण गजानन आचार्य उद्यान ,डाॕ बाबासाहेब आंबेडकर उद्यान , छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पांजरापोळ ते गणेश शेड खारदेवनगर घाटला चेंबुर ह्या मार्गाने येणार आहे. मात्र नुसती शिवज्योत नसुन ज्या प्रकारे महाराजांनी मुघलांना पराभुत केले त्यांच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन सध्याच्या परिस्थितीत कोरोनाला पराभुत करणे गरजेचे आहे हा संदेश सर्वसामान्य पर्यत पोहचविण्यासाठी कोरोना भगाव जनजागृती शिवज्योतीचे आयोजन दिनांक 31 मार्च शिवाजी पार्क दादर ते चेंबुर असे केले आहे. ह्या कोरोना भगाव शिवज्योत दौड दरम्यान कोरोनाबाबतीत जनजागृती करण्यात येइल.