मुंबई दि १५:माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात शालेय शिक्षण ,मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादे, अवर सचिव अजय भोसले,उर्मिला धाडवडे यांनीही डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.यांच्यासह मराठी भाषा विभागाचे व सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.