देशातील वैविध्यपूर्ण संस्कृती विदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

0

– केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक

पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य

            मुंबई, दि. 30 : देशाला विविध बोली भाषा, संस्कृती, विलोभनीय निसर्गसौंदर्याचे वरदान लाभले आहे. हा अनमोल ठेवा पर्यटकांच्या आकर्षणाचा नेहमीच केंद्रबिंदू राहिला आहे. विदेशी पर्यटकांना देशातील या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे आकर्षण आहे. हे लक्षात घेवून त्यावर आधारित पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

            छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथे देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय पर्यटन मंत्रालय तर्फे ‘पर्यटन पर्व’ हा उपक्रम 27 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत आहे. या कार्यक्रमात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्री. नाईक बोलत होते. कार्यक्रमास पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मुंबई पोर्ट ऑथोरिटीचे अध्यक्ष राजीव जलोटा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे प्रमुख सब्य मुखर्जी, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे ज्ञानप्रकाश आदी मान्यवर उपस्थित होते.

            केंद्रीय राज्यमंत्री श्री. नाईक म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘पर्यटन पर्व’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. परदेशी पर्यटक देशात यावेत यासाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. देशातील प्रत्येक राज्यातील पर्यटनाची वेगळी ओळख आहे.  ही माहिती सर्वांना व्हावी, यासाठी पर्यटन पर्व सारखे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने नाशिक, मुंबई पोर्ट ट्रस्ट येथेही पर्यटन स्थळ विकासासाठी निधी दिला आहे. जी – 20 मधील काही बैठका महाराष्ट्रात  होत आहेत  या बैठकांच्या माध्यमातून  राज्याला महाराष्ट्रातील पर्यटनाच्या बलस्थानांची माहिती देता येवू शकते,  असे केंद्रीय राज्यमंत्री श्री. नाईक म्हणाले.

पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य

– पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

          पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, राज्यात पर्यटन क्षेत्रात नव्याने काम करू इच्छिणाऱ्यांना शासन सर्वोतोपरी मदत करेल.  सकारात्मक निर्णय घेऊन पर्यटनवाढीला चालना देण्याचा  प्रयत्न करण्यात येईल. गोवा राज्यानेही पर्यटन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रातही पर्यटनातून रोजगार वाढीसाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल.

स्थानिक संस्कृतीची पर्यटकांना ओळख करून देणे गरजेचे

– शिक्षणमंत्री दीपक केसरकर

            शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, स्थानिक संस्कृतीची ओळख पर्यटकांना व्हावी, यासाठी उपक्रम राबविणे गरजेचे आहे. मुंबई, पुणे,नागपूर यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरामध्ये पर्यटनाचे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. पर्यटन पर्व हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. अशा उपक्रमातून पर्यटन वाढीस चालना मिळेल असे शिक्षणमंत्री श्री. केसरकर म्हणाले.

          यावेळी पर्यटन महामंडळाचे प्रदर्शन, टेक्सटाईल व हॅण्डीक्राफ्टस यांचे स्टॉलचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *