दिनांक – ५ जुलै २०२०
*तसेच या पुढे हिंदु समाज कोणताही अन्याय सहन करणार नाही*.
– श्रीराज नायर, प्रांत सह मंत्री व प्रवक्ता, वि.हिं.प. कोंकण प्रांत
ठाणे, दिनांक ५ जुलै रोजी विश्व हिंदू परिषद, बजरंगदल व इतर हिंदू संघटनांच्या ६०० कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येत बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या जेहादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. मा. जिल्हाधिकारी व मा. पोलीस आयुक्त यांना हल्ला करणार्या जेहाद्यांवर त्वरित कारवाई करावी या करिता निवेदन सादर करण्यात आले.
शुक्रवारी रात्री मुंब्रा येथे ५ ते ६ जणांच्या जमावाने लाठ्या, लोखंडी सळ्या तसेच इतर हत्यारांचा वापर करत बजरंगदलाच्या २ कार्यकर्त्यांना सुनियोजित पद्धतीने लक्ष केले होते. सुदौवाने या हल्यात दोन्ही कार्यकर्ते बचावले असून ते गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी अज्ञात इसमांच्या नावे तक्रार नोंदवली आहे. ४ दिवस उलटून ही आरोपीना अटक झालेली नाही. त्यामुळे सदर प्रकरणाचे गांभिर्य पाहता ह्या प्रकरणाचा तपास हा केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यात यावा.
उदयपूर, अमरावती प्रमाणे देशांत विविध ठिकाणी अनेक हिंदू नागरिकांना ठरवून सुनियोजित पद्धतीने लक्ष करण्यात येत आहे. या पुढे हिंदु समाज कोणताही अन्याय सहन करणार नाही. मुस्लीम तरुणांची माथी फिरवणाऱ्या PFI संघटने वर तत्काळ बंदी घालून मुस्लीम बहुल भागात पोलिसांनी हिंदूना संरक्षण पुरवावे. ही मागणी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सह मंत्री व राष्ट्रीय प्रवक्ता श्रीराज नायर, रा.स्व. संघाचे विवेकानंद वडके तसेच आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, बजरंगदल प्रांत संयोजक संदीप भगत, वि.हिं.प. ठाणे विभाग मंत्री मनोज शर्मा, वि.हिं.प. ठाणे जिल्हा मंत्री विश्वास सावंत, वि.हिं.प. कळवा जिल्हा मंत्री आशुतोष तिवारी यांच्या द्वारे करण्यात आली.