
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी अवमान करणारे वक्तव्य करून समस्त भारतीय महिलांचा अपमान केला आहे.याचे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत असून राष्ट्रवादीने याविरोधात ठिकठिकाणी आंदोलने केली आहेत. हे वक्तव्य म्हणजे महिलांचा अवमान करणारे असून त्याचा आता अखिल भारतीय वडार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकदादा शिंदे यांनीही जाहीर निषेध केला आहे.
यासंदर्भात संघटनेच्या कोअर कमिटीची तातडीने बैठक बोलावून या घटनेचा निषेध नोंदवला आहे. या बैठकीत अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून ठराव संमत करण्यात आला.तसेच संघटनेच्यावतीने या घटनेचा निषेध करण्यासाठी भारताच्या राष्ट्रपती मुर्म यांच्याकडे लिखित स्वरूपात तक्रार करून कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.तसेच ठिकठिकाणची वडार समाजाच्यावतीने निषेध केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्याचे नामदार अब्दुल सत्तार यांचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा मंजूर करावा,अशी मागणी अखिल भारतीय वडार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकदादा शिंदे यांनी केली आहे.