
महिंद्रा लाइफस्पेसेस® व भारतीय स्टेट बँक यांच्यात सामंजस्य करार
ग्राहक आणि दोन्ही कंपन्यांच्या कर्मचार्यांना वर्धित मूल्य देण्यासाठी भागीदारी
मुंबई, 14 जानेवारी, 2021 : महिंद्र समुहातील रिअल इस्टेट व पायाभूत सुविधा विकास क्षेत्रातील कंपनी ‘महिंद्रा लाइफस्पेसेस®’ आणि गृहकर्ज देणारी भारतातील सर्वात मोठी ‘भारतीय स्टेट बँक’ (एसबीआय) यांनी आज एका सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली. संपूर्ण भारतातील घरखरेदी करणाऱ्या ग्राहकांना अधिक सुधारीत व अखंडित अनुभव मिळावा, या उद्देशाने हा करार करण्यात आला. विविध सह-प्रचारात्मक कार्यक्रम आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठीचे उपक्रम यांचा समावेश या करारात करण्यात आला आहे. ‘एसबीआय’ आणि ‘महिंद्रा लाइफस्पेसेस®’ यांचे ग्राहक व कर्मचारी हे या करारामुळे, गृहकर्जाची जलद प्रक्रिया, मंजुरी, विशेष सवलती आणि योजनांचा लाभ घेण्यास समर्थ असतील.
‘महिंद्रा लाइफस्पेसेस®’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद सुब्रमणियन आणि ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे मुख्य महाप्रबंधक आणि रिअल इस्टेट विभागाचे प्रमुख श्रीकांत यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
‘महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लि.’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद सुब्रमणियन म्हणाले, “दोन्ही कंपन्यांचे ग्राहक व कर्मचार्यांसाठी ‘महिंद्रा’ची घरे अधिक सोयीस्कररित्या उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही ‘स्टेट बँके’बरोबर भागीदारी केली आहे. हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. नाविन्यपूर्णपणे डिझाइन केलेली हरीत-प्रमाणित घरे आणि जलदरित्या उपलब्ध होणारे गृहकर्ज यांच्या वितरणातून ग्राहकांना स्वतःची घरे मिळवून देणे व त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, हे आमचे संयुक्त धोरण अमलात आणण्यासाठी आम्ही भागीदारी केली आहे.”
‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे मुख्य महाप्रबंधक आणि रिअल इस्टेट विभागाचे प्रमुख श्रीकांत म्हणाले, “स्टेट बँकेने यापूर्वीच एमएमआर, बंगळुरू, पुणे, चेन्नई आणि नागपूर येथील ‘महिंद्रा लाइफस्पेसेस®’च्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. आता झालेल्या भागीदारीमुळे या मंजूर प्रकल्पांसाठी टीआरआयआर (टायटस इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट) आणि मूल्यांकन प्राप्त करण्यावरील खर्चावर बचत होऊन घरखरेदीदारांना लाभ मिळतील. अशा कर्जांच्या मंजुरीसाठी कमी वेळ लागणे, ही आमची प्रमुख ‘यूएसपी’ आहे.”
घरखरेदीचा अनुभव सुधारण्यासाठी ‘महिंद्रा लाइफस्पेसेस®’ आपल्या घरांमध्ये सतत नवनवीन बदल करत असते. कंपनीने पर्यावरणपूरक, निरोगी राहणीमानावर लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने ‘महिंद्रा लाइफस्पेसेस®’मधील सर्व घरे ‘हरित’ प्रमाणित बनविण्यात आली आहेत; तसेच, या प्रकल्पांमध्ये कचरा व्यवस्थापन, पाणी व ऊर्जा संवर्धन यांच्या उपायांचा समावेश करण्यात आला आहे.