

काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिम्मित चेंबुर विभागातील माहुल येथे काँग्रेस पार्टी वॉर्ड क्र. १५५ च्यावतीने इमारत क्र.१0, म्हाडा वसाहत,माहुल येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन लोकमान्य टिळक रुग्णालय , रक्तपेढी यांच्या सहकार्याने करण्यात आले होते . एकुण 67 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिरात चेंबूर विभागातील इतर पक्षातून काँग्रेस पक्षात आलेल्या तरुण कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि विभागातील इच्छुक रक्त दात्यानी उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने रक्तदान केले . मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप ,कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा व मा. मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर व माजी नगरसेविका सीमाताई माहुलकर यांच्यावतीने करण्यात आले होते .कार्यक्रमाचे संयोजन समाजसेवक राजेंद्र नगराळे यांनी केले स्थानिक कार्यकर्ते तुषार कदम ,राकेश गोसावी ,सुशांत जाधव .सुदेश गोगावले ,प्रदिप निषाद यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परीश्रम घेतले व मा. नगरसेवक राजेंद्र माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाज उपयोगी कार्य करून पक्ष वाढविण्याचा संकल्प ह्या तरूणांनी केला. सदर कार्यक्रमास माजीआमदार मधू चव्हाण , नगरसेविका सौ. संगीता हंडोरै ,जिल्हा अध्यक्ष हुकुमराज मेहता , लक्ष्मण कोठारी , कैलास आरवडे ,लक्ष्मण काळखैर ,स्टिफन नाडर ,नंदु जाधव , सौ.कीरण आल्टे , हसीना कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते . राक्तदान करून काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या तरूणांचे सर्व थरातुन कौतुक होत आहे. सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खुन दो मे तुम्हे आझादि दुंगा हे ब्रीद वाक्याने सर्व तरूणांन मध्ये जोष जागृत केला होता व देशाला स्वातंत्र्य मिळाले .त्याच घटनेची पुनरावृत्ती सध्याच्या वेळेस केंद्र शासनाच्या विरोधात बेरोजगारी ,करोना महामारी चे अयोग्य नियोजन ,महागाई ह्या सर्वांन विरोधात ललकार देऊन ह्या तरूणांनी इतिहासाची पुनुरावृत्ती केल्याची चर्चा संपूर्ण विभागात होत आहे.