
माझ्या आयुष्याच्या सुरुवातीला काही दिवस मी पंढरपूरच्या सहवास्त घालवली. मला मुडदूस आजाराने ग्रासले होते त्यामुळे पंढरपूरच्या रीमांडमध्ये कोणीतरी सोडण्यात गेले। चंद्रभागेच्या खुशीत बसलेले गोपाळपूर या गावामध्ये,भोलेनाथचे प्राचीन मंदिर आहे.मंदिराच्या परिसरामध्ये ऋषीमुनी साधना करतात. ऋषिमुनींनी साधनेच्या माध्यमातुन जेकही प्राप्त करतात, ते लोकांना दान स्वरूपात देण्याचे ते कार्य करत. माझ्या आजाराची कल्पना जेव्हा ऋषींना कळली तेव्हा, ऋषी-मुनींनी आयुर्वेदिक उपचार पद्धतीने माझा जीव वाचवला.वारकऱ्यांना (भाविकांना) माझ्याबद्दल कळालं तेव्हा मला बघायला भेटायला येणारे भोळी भाबडी वारकरी काय ना काही,तरी घेऊन येतं त्यामध्ये कोनी पटकारात बांधलेल्या भाकरी अन्याच तर,काही लोक पंच पक्वान्न मधी पदार्थ आणायचे,तर काही फळ आणत. असो……
वारकऱ्याला विठ्ठलाची तसेच, विठ्ठलाला वारकर्याची सदैव आस लागलेली असते. हल्लीचा अनुभव वारकरी, हरिपाठ, माऊली या आणि अशा अद्भुत गोष्टी भोवती मन भिरभिरत राहतं आणि त्याला अनेक गोष्टींचा साक्षात्कार होतो.. खरच कधी वाटतं; वारी सामाजिक आहे, कधी मानसिक , कधी कौटुंबिक तर कधी आध्यात्मिक.. वारी नेमकी आहे तरी कशी याचं कधी कधी कोडच पडतं.. अखंड दिंडी ही एका कुटुंबासारखं जगत असते हा माझा अनुभव आहे .. एकमेकांशी समरस होऊन जीवनाचे कडू – गोड अनुभव एकमेकांना सांगत मन हलकं करणार करणारा हा एक कुटुंबाचा उत्कृष्ट नमुना आहे .. एकमेकांची काळजी घेत, घासातला घास एकमेकांना भरवत पुन्हा एकवार बाल्य अनुभवत चालणार एक कुटुंब … चार शेंगदाणे म्हणा वा दोन भाजलेले चिंचोके एका ओंजळीतून दुसर्या ओंजळीत सरकतात आणि ती ओंजळ भरून जाते.. माऊली माऊली म्हणत एकमेकांच्या हृदयावरचा भार इथे हलका केला जातो. वारी ही प्रत्येक वार क-याला विस्तारित कुटुंब देते म्हणून ती कौटुंबिक आहे असं वाटतं ..
आपण एकटे नाही; आपल्यासारख्या असंख्याना अनेक गोष्टीला आयुष्यात सामोरे जावं लागलं हे आकलन होत जातं ..मनात साचलेल्या व्यथा दुःख मोकळी होत जाऊन मन हलकं होतं ; यातून जीवनाकडे पाहण्याचा एक लवचिक दृष्टिकोन हळूहळू विकसित होत जातो. अनेक अभंग मन बुद्धी यातील चढाओढ, तारतम्य भाव याची नकळत शिकवण देत जातात.. इथे येणारा प्रत्येक वारकरी माऊलीच्या भेटीला जातो आहे. या भावनेने चालत असतो . यातून आपल्यापेक्षा उच्च, एखादी शक्ती आहे आणि ती आपल्यासाठी उभी राहणार हा आत्मविश्वास ही श्रद्धा येत जाते.. मग डिप्रेशन,एंनजायटी या गोष्टींना थाराही मिळत नाही ..वारकऱ्यांचा दृष्टिकोन इतका सकारात्मक असतो की त्यांच्या आयुष्याच्या कहाण्या ऐकल्या तर त्यांच्या धैर्याची केवळ कमाल वाटते .. वारी ‘संगीत थेरपीचं उत्तम उदाहरण आहे..टाळ, मृदंग , आणि गायन याने मन अगदी शुचिर्भूत होतं…हे 21 दिवस वर्षाची ऊर्जा देतात..मनाचे अनेक ताप नकळत हरतात.. नव्या दमाने माणूस पुन्हा घरी जातो..म्हणून वारी नावाची एक मानसोपचार आहे अस मला वाटतं…
तसंच कधी या वारीचा सामाजिक पैलूही मला खुणावतो..
समाजातल्या तीन पिढ्या इथे एकत्र नांदत असतात.. दहा पंधरा दिवसाच्या वास्तव्यात एकमेकांशी छान मिसळून जातात. एकमेकांशी सहज जुळवून घेत जातात. वारीमध्ये जात-पात, राजकारण यांचा अडसर अजिबात नसतो.. सारे भेद अमंगळ मानणारी म्हणून एक उत्तम समाजाचा नमुना वारीमध्ये घडी घडीला दिसतो..
वारीदरम्यान प्रत्येक वारकरी पोटभर जेवतो; जेवू शकतो .. चहा, दूध ,नाश्तापाणी आणि दोन्ही वेळचं जेवण याची इतकी सहज आणि अचूक व्यवस्था कशी होते हे खरंच आश्चर्यजनक आहे ..काही ठिकाणी एक माणूस जरी भोजनाला जास्त असला तरी “आधी कळवत जा” अशी सूचना येते त्या पार्श्वभूमीवर हे सुग्रास भोजन देताना लोकांना इतका पुरवठा कसा होतो हा प्रश्न पडतो.. देताना इतकं श्रद्धेनं, प्रेमानं दिलं जातं की जणू आपण विठ्ठलालाच जेवू घालत आहोत… केवळ सामाजिक पातळीवर इतका मोठा अन्नदानाचा यज्ञ पार पडतो…!! एकमेकांचे उद्योग, व्यवसाय, शेती यांबाबतही विचारांची देवाण-घेवाण होते .. समाजाला एकसंधपणे जोडून ठेवण्याचं खूप मोठं काम वारीमुळे घडत असतं.. वारकरी दीडशे ते दोनशे किलोमीटर चालतात.. अगदी आबाल वृद्धही चालतात.. ही शक्ती त्यांना मिळते ती अखंड नामस्मरणातून ..सतत अभंग , नामस्मरण, हरिपाठ ,भजन , कीर्तन यामध्ये शरीर आणि मनाला चैतन्य येतं.. जीवनाचं तत्त्वज्ञान हृदयात तेवणाऱ्या “त्या” ज्योतीच्या प्रकाशात स्पष्ट दिसू लागतं.आणि जगण्याला एक नवीन ऊर्जा मिळते..म्हणून ही सामाजिक !!
सारा प्रवास शेवटी आपल्या अंतर्मनात डोकावण्यासाठी … अध्यात्म या सार्या पैलूंचा कळस…
“कोण असे,
मी सहजपणे कळू दे..”
सारी आवरणं गळून पडावी आणि केवळ सर्वव्यापी चैतन्याची अनुभुती व्हावी.. मनाचा गाभारा त्या अनुभूतीने लखलखून निघावा या पातळीपर्यंत घेऊन जाण्याची शक्ति असलेली ही वारी … म्हणून ती आध्यात्मिक… कारण ती प्रत्येकालाच आहे तिथून उन्नत घेऊन जाते..
अशी ही वारी …माऊलीच्या ओढीने चालवणारी, निर्व्याज मैत्र जपणारी , ऊन पाऊस यांच्या खोड्याना न जुमानता ध्येयपंथी घेऊन जाणारी , शरीर मनाला प्रचंड ऊर्जा देणारी … आणि खर तर पटकन संपणारी आणि तरीही वर्षभर मनात रुंजी घालत राहणारी ….
वारी अनुभवावी..!!
!!युवा आधार फौंडेशन!!
!! गोरख उबळे-अडवोकॅटे !!