
मुंबई, दि. 8:- प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव ‘ईद-ए-मिलाद’ निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
ईद-ए-मिलादाच्या पुर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, प्रेषित पैगंबर यांनी समाजाला शांती, बंधुभावाची शिकवण दिली. या शिकवणीचा आदर करून त्यांना अभिप्रेत समाज निर्मितीचे प्रयत्न करूया. उत्सवाचे हे पर्व सुख,समृद्धी आणि समाधान घेऊन येवो, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.’