
ठाणे, दि. 14 : देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे, तहसीलदार राजाराम तवटे आदी यावेळी उपस्थित होते. पंडित नेहरू यांचा जन्मदिन 14 नोव्हेंबर हा ‘बाल दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्त मुख्यमंत्री यांनी राज्यातील बालकांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.