नवी दिल्ली, 22 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची सदिच्छा भेट घेतली.
मुख्यमंत्री श्री शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावरील पुस्तक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना भेट दिले.
यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार सर्वश्री राहुल शेवाळे, हेमंत पाटील आणि माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यावेळी उपस्थित होते