
मुंबई, दि. 7 : महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध पहिले आवाज उठवणारे राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसचिव ज. जी. वळवी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यांच्यासमवेत मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.