
राज्यातील शाळा महाविद्यालयाबाहेरील ई- सिगारेट,दारू, व पानगुटख्या पासून तरुणाईला वाचवा- राज्यभरातून सरकारला ईमेल भीम आर्मीचे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन मुंबई-१९-(प्रतिनिधी )-मुंबईसह राज्यातील शाळा व महाविद्यालयातील कुमारवयीन व तरुण विद्यार्थी विविध व्यसनात गुरफटत चालले असून देशाचे भविष्य असलेल्या या तरुणाईला वाचविण्यासाठी सर्व शाळा व महाविद्यालयानजीक असणारी दारूविक्रीची व पानगुटख्याची दुकाने तावरीत हटवावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे या मागणीसाठी भीम आर्मी , रुग्णसेवक संघटना , एक्वही एक पेन अभियान , दारूबंदीवर काम करणाऱ्या अस्तित्व हि महिलांची संघटना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्यासह विविध पक्षसंघटनांनी व शिक्षकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे इमेल पाठवून केली आहे . सिगारेट ओढणे, पानगुटखे खाणे,दारू पिणे आरोग्यास हानिकारक आहे. यामुळे तुम्हाला कर्करोग ,लिव्हर खराब होणे व ईतर गंभीर आजार होतात. सिगारेटच्या प्रत्येक पाकिटावर असलेली धोक्याची सूचना वाचूनही सिगारेट ओढणारे पानगुटखे खाणारे व दारू पिणारे पितातच. शासनाने सार्वजनिक ठिकाणी तसेच प्रार्थनास्थळे ,शाळा व महाविद्यालयीन परीसरापासून जवळपास १०० मीटरवर धुम्रपान पानगुटखे व दारूवर बंदी घातली आहे. काही ठिकाणी स्मोकींग झोनदेखील निर्माण करण्यात आले आहे. दुर्दैवाने या सिगारेटची जागा आता” ई-सिगारेटने” घेतली. वेब सिगरेट नाव नवीन नसले तरी अनेक शाळांमध्ये व महाविद्यालयीन परीसरात या वेबची लाट आली आहे. ७५० रुपया पासून ५ हजार रुपयापर्यंत किंमत असलेली ही वेब सिगारेट तसेच पानगुटखे मुंबईसह राज्यातील बहुतेक शाळा व महाविद्यालया जवळच्या पानटपरीवर किंवा विशिष्ट ठिकाणी मिळतात.शिवाय विद्यार्थ्यांच्या जिवितास अपायकारक असणा-या दारूची दुकाने परमिटरूम देखील १०० मीटरच्या आता अस्तित्वात आहेत .या गोष्टी सहज उपलब्ध होत असल्याने तरूण विद्यार्थी याकडे आकृष्ट होऊन व्यसनांच्या आहारी जात असल्याची खंत भीम आर्मीचे अशोक कांबळे , अस्तित्व संघटनेच्या प्रेमलाताई सोनोने , रुग्णसेवाक संघटनेचे भीमेश मुतुला एक वही एक पेन अभियानचे सुमित दाभाडे ,व पीपल्स रिपब्लिक पार्टीचे राजेश जाधव यांनी आपल्या ई -मेलद्वारे व्यक्त केली आहे . भीम आर्मीचे अशोक कांबळे यांनी आपल्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले आहे
शाळा, महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून पोलीस तक्रारी होत नाहीत व यामागे रॅकेट असल्यामुळे भीतीपोटी वाच्यताही केली जात नाही.अशी अनेक प्रकरणे दाबून टाकली जातात. भारतीय कायद्याने अशा प्रकारच्या सिगारेट पानगुटखे वापरण्यावर व विक्रीवर बंदी आहे मात्र असे असले तरी या व्यवसायात गुंतलेले लोक आपले सावज शाळा, महाविद्यालयाबाहेर असलेल्या पानपट्टीची दुकाने, व खाऊगल्लीत हेरतात. दुर्दैवाने तरुण पिडी या व्यसनात गुरफटत आहेत.आपल्या देशाचे भविष्य असलेली ही तरूण पिढी वाचवायची असेल तर शासकीय परीपत्रकानुसार शाळा व महाविद्यालयीन परीसरात तसेच आसपासच्या परिसरात असलेले तंबाखूजन्य पदार्थ व अल्कोहोल विक्रीची दुकाने पानपट्टीचे अड्डे तसेच पानमसाला गुटखे व ईसिगारेटचे रॅकेट उध्वस्त करून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी करावी अशी मागणी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांच्याकडे करण्यात आली आहे