काश्मिर खोऱ्यात हिंदूंच्या होत असलेल्या निर्धृण हत्येच्या निषेधार्थ ९ ऑक्टोबरला बंजरंगदला तर्फे देशव्यापी तीव्र निषेध आंदोलन.
“भारताच्या हातूनच इस्लामिक जेहादी अतिरेक्यांची कबर खोदली जाईल – श्री मिलिंद परांडे”
वर्ष १९९० प्रमाणेच काश्मिर खोऱ्यात पुन्हा निरपराध हिंदू-शिखांना हेरून त्याची निर्धृण हत्या केली जात आहे ह्या भ्याड हल्यांचा तीव्र निषेध करण्यासाठी आज दिनांक ९ ऑक्टोबर रोजी बजरंगदल व विश्व हिंदू परिषद तर्फे संपूर्ण देश भरात तीव्र निषेध आंदोलन पुकारून आतंकवादाचा खंदा समर्थक असलेल्या पाकिस्तानचा तसेच पाक पुरस्कृत आतंकवादाचा तीव्र निषेध व्यक्त केला. या भ्याड जेहादी हल्यात नाहक बळी गेलेल्या निरपराध हिंदू-शीखांच्या कुटुंबियां प्रती तीव्र संवेदना व्यक्त करताना मिलिंदजी म्हणाले की, विहिंपचा प्रत्येक कार्यकर्ता आणि संपूर्ण हिंदू समाज पीडितांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कम उभा आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.
गेल्या ५ दिवसात काश्मीर खोऱ्यात झालेल्या ७ भारतीय निष्पाप हिंदू नागरिकांच्या हत्येचा निषेध करत बजरंगदल, व विश्व हिंदू परिषदेने केंद्र सरकार कडे मागणी केली आहे.
१. केंद्र सरकारने जेहादी आतंकवादाच्या मुसक्या आवळण्यासाठी पाकिस्तानाला येग्या धडा शिकवावा.
२. कश्मीर मधील निर्वासित हिंदूंचे पुन्हा काशीर खोऱ्यात पुनर्वसन करून त्यांना स्वच्छंदी आयुष्य जगता येईल हे सुनिश्चित करावे व यासाठी योग्य सुरक्षा यंत्रणा उभारावी. विस्थापित हिंदू समाजाच्या पुनर्वसना शिवाय आतंकवादाला आळा बसवता येणार नाही.
विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय महामंत्री श्री मिलिंद परांडे यांनी राजकीय पर्यटन करण्यार्या जेहादी अतिरेक्यांच्या शुभचिंतकांना विचारले आहे, “जेव्हा निष्पाप हिंदू व शीख नागरिकांना निवडून त्यांची हत्या केली जाते तेव्हा त्यांची जीभ शिवली जाते का ? तेव्हा तुमचे सेक्युलरीजम कुठे जाते ?
तसेच श्री मिलिंदजी यांनी अतिरेक्यांच्या समर्थकांना जाहीर चेतावणी देत स्पष्ट ताकीद दिली आहे. “भारताच्या पवित्र भूमीला रक्तरंजित करण्यार्यांना हे समजायला हवे की त्यांचे भारताला तोडण्याचे कुत्सित प्रयत्न कधीही सफल होऊ शकणार नाही. देशच्या एकता व अखंडतेसाठी सर्व देशवासी बांधील आहेत. दहशतवादाचा राजकीय शस्त्र म्हणून वापर करणाऱ्या जेहादी पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी जागतिक समुदायालाही पुढे यावे लागेल. जे लोक इस्लामिक दहशतवादी सापांचे पालन पोषण करतात त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की हे विषारी साप तुम्हालाही चावतील. ह्या विषारी सापांचे फणे कसे चिरडायचे हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. व त्यासाठी बजरंगदल, विश्व हिंदू परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता तत्पर आह. आता भारताच्या हातूनच इस्लामिक जेहादी अतिरेक्यांची कबर खोदली जाईल”.