
दिनांक – २ फ्रेब्रुवारी २०२०
प्रेस वक्तव्य..
*हिंदू धर्म विरुद्ध प्रक्षोभ भाषण करणाऱ्या माथेफिरूविरुद्ध जाहीर निषेध* ….
३० जानेवारी रोजी पुणे येथे आयोजित एल्गार परिषदेमध्ये शरजील उस्मानी याने अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारी, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी विधाने केली आहेत. “आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, हिंदू समाज हत्या करतो, घरी जाऊन आंघोळ करतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा हत्या करतो” अशाप्रकारची ही गंभीर विधाने केली आहेत.
हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा असून त्यांच्यामुळेच आपण आज हिंदू म्हणून जगतोय, ह्याच महाराष्ट्रात हिंदू संघटक स्वातंत्रवीर सावरकरांनी हिंदूंना संघटित करण्याचे कार्य केले आणि ह्याच महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी हिंदू संघटित व्हावा म्हणून घरगुती गणपतीला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले. आज ह्याच महाराष्ट्रातील पुणे शहरात गेल्या कित्तेक कालखंडात एल्गार परिषदेच्या माध्यमातून काय झाले हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहूनही त्या परिषदेला परवानगी मिळते कशी ? त्यामुळे एक माथेफिरू युवक हिंदू विरोधी प्रक्षोभक भाषणे करतो व त्याच्या विरोधात महाराष्ट्र सरकार कोणतेही कठोर पाऊल उचलत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल.
वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळा साहेब ठाकरे यांनी सदैव हिंदुत्वासाठीच राजकारण केले अश्यावेळी त्यांचेच सुपुत्र श्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असताना हे असले नीच प्रकार करण्याची त्या युवकाची हिम्मत होतेय ही शरमेची बाब आहे. तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ह्या घडलेल्या प्रकारा विरोधात कठोर कारवाईचे आदेश देतील अशी अपेक्षा करतो.
– प्रस्तुत कर्ता
*श्रीराज नायर*
सहमंत्री / मिडिया प्रभारी
विश्व हिंदू परिषद
मुंबई