
‘वी’ने मुंबई सर्कलमधील आपले आघाडीचे स्थान कायम राखले, टीआरएआयकडील माहितीनुसार मे महिन्यात सर्वात जास्त सब्स्क्रायबर्सनी ‘वी’ची निवड केली
टीआरएआयने नुकताच मे महिन्याचा सब्स्क्रायबर डेटा प्रकाशित केला. या माहितीनुसार, मुंबईमध्ये एकूण ३,४४,५५,४४२ मोबाईल युजर्स असून नवीन ६,२५१ युजर्स त्यामध्ये सामील झाले आहेत.
ही माहिती असे दर्शवते की, मुंबईमध्ये मे महिन्यात ‘वी’च्या सब्स्क्रायबर संख्येमध्ये सर्वात जास्त म्हणजे तब्बल ६५,७७४ इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे आता या संपूर्ण सर्कलमध्ये एकूण १,१८,७२,५१० सब्स्क्रायबर्स ‘वी’च्या सेवांचा लाभ घेत आहेत.