सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते भूमीपूजन

0

         सिंधुदुर्गनगरी दि : 27 वेंगुर्ला शहरातील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहासमोर (कॅम्प परिसर) मुंबई विद्यापीठांतर्गंत उभारण्यात येणाऱ्या सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचे भूमिपूजन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांच्या हस्ते राज्यपालांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुहास पेडणेकर, प्र.कुलगुरू प्रा.रविंद्र कुलकर्णी, प्र.कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वेंगुर्ला नगर परिषद प्रशासक प्रशांत पानवेकर आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *