आपण सर्वांनी मिळून स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी आग्रही राहूया “शुभ दीपावली,स्वच्छ दीपावली” उपक्रमास बांद्रा पश्चिम येथून सुरूवात

0

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

                                     

         

            मुंबई,दि.१५: मुंबईतील नागरिकांना स्वच्छतेच्या सोयी चांगल्या दर्जाच्या मिळाव्यात यासाठी आपण सर्वांनी मिळून आग्रही असले पाहिजे. स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी “शुभ दीपावली,स्वच्छ दीपावली” हा उपक्रम संपूर्ण मुंबई उपनगरात डिसेंबर २०२२ पर्यंत राबवणार असल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

             बांद्रा पश्चिम मुंबई, गोविंद पाटील रोड खार सार्वजनिक शौचालय येथे “शुभ दीपावली,स्वच्छ दीपावली” उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते.यावेळी माजी मंत्री ॲड.आशिष शेलार, उपायुक्त रणजीत ढाकणे, वॉर्ड ऑफिसर विनायक विसपुते, जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडे, यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            मंत्री श्री.लोढा म्हणाले,मुंबई उपनगर येथील संपूर्ण जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, रंगरंगोटी, दुरुस्ती करणे, आवश्यकता भासेल तिथे ड्रेनेज पाइप लाईन बदलणे, शौचालयातील आसन क्षमता  वाढवणे,शौचालय जर  खराब असेल तर त्याची पुनर्बांधणी करणे असा उपक्रम दीपावलीच्या दरम्यान आपण राबवणार आहोत. आज  या उपक्रमाची आपण बांद्रा पश्चिम येथून सुरुवात केलेली आहे, दिवाळी पुर्वी नागरिकांना स्वच्छ सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शौचालयांकरिता विज बिल आकारणी करताना व्यावसायिक दराने न आकारता घरगुती कनेक्शनच्या दराने विज बिल आकारण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना प्रशासनाला केली. नागरिकांनीही या उपक्रमासाठी सहकार्य करावे. काही सूचना असतील तर जरूर कराव्यात  असे मंत्री श्री.लोढा म्हणाले.

            यावेळी माजी मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक वॉर्ड ऑफिसर विनायक विसपुते यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *