कुर्ल्याच्या प्रबोधन शाळेत आगळा वेगळा प्रवेशोत्सव साजरा

0


Anil Galgali : प्रबोधन कुर्ला पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळेत आज ‘प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात आला. सकाळी मुला – मुलींचे ढोल- ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी संपूर्ण शाळा फुले रांगोळयांनी सजवण्यात आली होती. मुले मोठ्‌या उत्साहात शाळेच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करत होती. प्रवेशद्वाराजवळ शाळेच्या आणि सर्व शिक्षकवर्ग स्वागतासाठी उपस्थित होते. त्यांनी फुलांच्या वर्षावात विद्‌यार्थ्यांचे स्वागत केले. त्याचबरोबर शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांचे आरती ओवाळून औक्षण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भाऊ कोरगांवकर, विश्वस्त शलाका कोरगांवकर, अनिल गलगली, अजय शुक्ला यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले. शाळेत प्रथमच इंटरॅक्टह डिजिटल बोर्ड लावण्यात आला. त्याचे उद्‌घाटन सुधीर मल्होत्रा आणि माया मल्होत्रा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार प्रसाद मोकाशी, वर्षा तावरे, यावेळी निलेश कोरगावकर, मुख्याध्यापिका विद्या फलके, मुख्याध्यापिका विशाखा परब,  शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. 

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *