कोयना जलविद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांना पदभरतीत प्राधान्य – शंभूराज देसाई

0

            मुंबई, दि. 19 : कोयना जलविद्युत केंद्र पोफळी येथील पात्र प्रकल्पग्रस्तांचा ऊर्जा विभागाच्या तांत्रिक पदभरतीमध्ये प्राधान्याने विचार करावा. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश सातारा  जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

                कोयना जलविद्युत केंद्र पोफळी  येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत मंत्रालयातील दालनात  बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी आमदार सदानंद चव्हाण, उपसचिव ऊर्जा सतीश सुपे, सातारा येथील अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे, सहाय्यक कामगार आयुक्त रत्नागिरी संदेश आयरे, पुनर्वसनचे उपसचिव धनंजय नायक, यासह कोयना  जलविद्युत प्रकल्प येथील प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

                पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, कोयना जलविद्युत केंद्र पोफळी येथील पात्र प्रकल्पग्रस्तांना ऊर्जा विभागात भरती करताना डावलले जावू नये. कोणताही पात्र प्रकल्पग्रस्त  भरतीपासून वंचित राहू नये यासाठी ऊर्जा, जलसंपदा तसेच यामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व विभागांनी सर्वानूमते प्रस्ताव बनवावा. ऊर्जा विभागाच्या भरती  प्रक्रियेत जे प्रकल्पग्रस्त आहेत आणि ज्यांच्याकडे विहीत पात्रता आहे त्यांना भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्यात यावे. कंत्राटी पदभरतीमध्ये या प्रकल्पग्रस्तांचा प्राधान्याने विचार करावा या विषयांचा यामध्ये समावेश करावा. सर्वसमावेशक प्रस्तावानंतर याबाबत निर्णय घेता येईल, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *