चेंबूरमध्ये आंदोलना दरम्यान शिवसैनिक व पोलिसांमध्ये बाचाबाची!

0

मागील काही दिवसांपासून केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे व शिंदे गटाचे रामदास कदम हे शिवसेना पक्षप्रमुख,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सतत गरळ ओकून खालच्या पातळीची टीका करत असल्याचा आरोप करत चेंबूर रेल्वे स्थानक जवळ शिवसेना विभाग क्र. ९ च्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान नारायण राणे व रामदास कदम यांच्या फोटो असलेला बॅनर आंदोलक महिला शिवसैनिकांकडे असल्यामुळे चेंबूर पोलिसांनी तो ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस व शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली त्यामुळे काही काळ वातावरण तणावाचे झाले होते. बॅनर ताब्यात घेणाऱ्या पोलिसांना शिवसैनिकांनी अटकाव करत जोरदार घोषणाबाजी केल्या. यावेळी शिवसैनिकांनी शिंदे गटाचे खा. राहुल शेवाळे व शिंदे सरकारच्या दबावाखाली जाणूनबुजून शांततेत चाललेलं आंदोलन पोलिसांच्या मदतीने त्याला गालबोट लावत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *