धोकादायक व्यक्ती व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक सराईत गुंड राजेश नारायण पिल्ले स्थानबध्द

0

Google image


दिनांक ०२/०७/२०२२ रोजी रात्री ११.३० वा. च्या सुमारास विष्णुनगर म्हाडा बिल्डींगच्या बाजुचे मोकळे मैदान, विष्णुनगर, चेंबुर, मुंबई, ७४ या ठिकाणी फिर्यादी श्री. नारायण लक्ष्मण काडदेकर, वय ५९ वर्षे यांचे परिसरात राहणारा इसम राजेश पिल्ले याने फिर्यादीस “इधर टॅक्सी पार्कीग करनेका है, तो मुझे हप्ते का ५०० रुपये देना पड़ेगा ! ” असे बोलून फिर्यादींनी पैशाची मागणी केली असता फिर्यादीने त्यास नकार दिल्याने त्याचा राग मनात धरून नमुद इसमाने फिर्यादीच्या पोटाला चाकु लावून त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. सदरवेळी आजुबाजुचे लोक फिर्यादीचे मदतीस आले असता त्यांचे दिशेने गुंड इसम राजेश पिल्ले याने चाकू फिरकावून, ” कोई आगे आया तो उसको जिंदा नही छोड़ेगा! “अशी धमकी देउन फिर्यादी तसेच इतर लोकांचे रिक्षा व टॅक्सीचे काचा फोडुन नुकसान करून शिवीगाळ केली म्हणून फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आर. सी. एफ. पोलीस ठाणे गु.र.क्र. ४६९/२०२२ कलम ३८५, ३२३, ५०४, ५०६ (२), ४२७ भा.द.वि. सह कलम ३७ (१) (अ), १३५ मपोका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाच्या तपासात असे निष्पन झाले की, इसम नामें राजेश नारायण पिल्ले उर्फ अब्दुल रेहमान शेख, वय ३९ वर्षे, धंदा नाही रा. ठी. रूम नं. ४८५, गणेश चाळ, विष्णुनगर झोपडपटटी, एल व गडकरी मार्ग, चेंबुर, मुंबई ७४ हा आर.सी.एफ. पोलीस ठाणे हद्दीतील विष्णु नगर, गडकरी खान व लगतच्या परिसरात दहशत निर्माण करून प्राणघातक हत्यारे जवळ बाळगुन मारामारी करणे, जबरी चोरी करणे, महिलांचे विनयभंग करणे, खंडणी मागणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून त्याची दहशत पसरवून सार्वजनिक शांतता व सुरक्षितेतसाठी धोकादायक व्यक्ती झाला असुन त्याचे विरूद्ध आर सी एफ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे नोंद आहेत.

नुमद इसमा विरूद्ध सन २०१३ पासुन गुन्हे नोंद असुन त्याच्याविरूध्द यापूर्वी फौजदारी दंड प्रकीया संहिता व महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आर सी एफ पोलीस ठाणे यांनी इसम नामे राजेश नारायण पिल्ले याचे विरुद्ध दाखल गुन्हयाचे अनुषंगाने एम. पी. डी. ए. कायदा १९८१ अन्वये स्थानबध्द कार्यवाहीसाठी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-६, मुंबई यांचे मार्फतीने मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांचेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांनी दिनांक ०७/१०/२०२२ रोजी इसम राजेश नारायण पिल्ले, यास स्थानबद्ध करण्याचे आदेश पारीत केल्याने, दिनांक ०८/१०/२०२२ रोजी त्यास ठाणे मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले…

यावर्षी जानेवारी २०२२ पासून परिमंडळ ६ अंतर्गत ” महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ति दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हिडीओ पायरेटस), बाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणारे व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम (M.P.D.A) १९८१ अन्वये केलेली ही दुसरी कारवाई असून यापूर्वी देखील आर सी एफ पोलीस ठाणे हद्दीतील आरोपी कार्तिक अण्णादुराई देवेंदर उर्फ बाबु यायेविरुद्ध एम पी डी ए कायदयाखाली कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे व वारंवार गुन्हे करून सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नसुन त्यांच्या विरुद्ध भविष्यात देखील अशा प्रकारची कडक कारवाई करण्यात येईल.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *