मा. नगरसेविका सौ.आशाताई सुभाष मराठे यांचे एम.एम.आर.डी.ए.आयुक्तांना दिलेल्या तक्रारी नंतर एम.एम.आर.डी.ए प्रशासन झाले खडबडून जागे.!

0


२०१८ मध्ये मेट्रो लाईन ४ आणि मेट्रो लाईन २ बी या दोन्ही लाईनचे काम चालू करण्यासाठी
रस्त्यामध्ये पत्रे लावलेत परंतु गेली ४ वर्ष नियुक्त केलेल्या रिलायन्स ठेकेदार पळून गेल्याने
काम थांबलेले आहे. याचा ४ वर्ष चेम्बुरकर त्रास सहन करीत आहे. वाहतुकीचा प्रचंड खोळंबा
होतो आहे. वाहतूक सुरक्षा रक्षक नसल्याने अपघातात एका व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे.
अश्या परिस्थितीत एम.एम.आर.डी.ए. निष्क्रिय असल्याने सौ. आशाताई मराठे यांनी एम.एम.आर.डी.ए.च्या
आयुक्त श्री राजेश श्रीनिवास यांना लेखी तक्रार केली आणि सदर रस्त्यातील पत्रे त्वरित काढा नाही तर भाजप चे
कार्यकर्ते चेम्बुरकारासह स्वतः पत्रे काढतील आणि रस्ता वाहतुकीस मोकळा करून देतील असा सक्त इशारा
दिल्या नंतर तातडीने एम.एम.आर.डी.ए.च्या कार्यकारी अभियंता मा.शिवानी पाटील आणि त्यांच्या सहकार्याने
मेट्रो लाईन ४ ची पाहनि करून सिद्धार्थ कॉलनी – पोस्टल कॉलनी येथील पत्रे ८ दिवसांत काढून टाकणार असे
आश्वासन दिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *