मुंबईतील दिशा नामफलकावर 150 कोटींचा चुराडा! वॉर्ड स्तरावर काम केल्यास महानगरपालिकेचे वाचतील 75 कोटी

0
Anil Galgali.

मुंबईतील दिशा नामफलकावर 150 कोटींचा चुराडा!
वॉर्ड स्तरावर काम केल्यास महानगरपालिकेचे वाचतील 75 कोटी
आरपीएस इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्पेको इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सर्व प्रयत्न
मुंबईतील पूर्व, पश्चिम आणि शहर विभागात महानगरपालिकेच्या रस्त्यावर वाहतुक सुविधा अंतर्गत दिशा नामफलकाचे 150 कोटींची निविदा बाबत निश्चित करण्यात आलेल्या अटी व शर्ती विशिष्ट कंत्राटदार असलेले आरपीएस इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर यांस लाभदायक असल्याने स्पर्धा होणार नसून यात पालिकेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहे. हेच काम वॉर्ड स्तरावर केल्यास पालिकेचे 75 कोटी वाचतील. 
अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महानगरपालिका आयुक्त याच्या निदर्शनास आणले की काही विशिष्ट कंत्राटदारांना लाभ दिला जात आहे यामुळे कंत्राटदारांची मक्तेदारी निर्माण होईल आणि पात्र बोलीदारांच्या संख्येत कपात होईल. संबंधित महापालिका अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात झालेले संगनमत तोडण्यासाठी स्पर्धा होणे आवश्यक असून टर्नओव्हर बाबत अटी व शर्तीत बदल करण्याची आवश्यकता आहे.
अधिकारी व कंत्राटदार यांच्यातील संगनमताने महापालिकेचे आर्थिक नुकसान होईल आणि करदात्यांच्या पैशाचा अपव्यय होईल. गैर-योग्यतेमुळे कामाच्या गुणवत्तेशी तडजोड होईल. हे नुकसान टाळण्यासाठी निविदा रद्द करण्याची मागणी गलगली यांची आहे. तसेच 150 कोटी खर्च करण्याऐवजी वॉर्ड स्तरावर परिरक्षण विभागास कामांचे वाटप करत स्थानिक पातळीवर काम करुन घेतल्यास निम्म्याहून अधिक रक्कम 75 कोटी वाचविले जाऊ शकते.
या निविदेस महानगरपालिकेने 2 वेळा मुदत वाढ दिली असून नवीन मुदत 10 मे 2022 आहे.  यापूर्वी 30 मार्च आणि 20 एप्रिल अशी मुदत होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *