विले पार्ले येथील आपद्ग्रस्त झोपट्टपट्टी वासियांना पर्यायी घरे उपलब्ध करून द्यावीत – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

0

            मुंबई, दि. 26 :  विलेपार्ले येथील नुकसानग्रस्त होऊन कोसळलेल्या १० बांधकामांच्या बदल्यात पर्यायी घरे मुंबई महापालिकेने के पश्चिम विभागातच उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज दिले.

            अंधेरी तालुक्यातील विलेपार्ले पश्चिम, मुंबई ४०००५६ मिठीबाई कॉलेज जवळ, येथील रुतुराज हॉटेल शेजारील नाल्याजवळील इंदिरानगर येथे काल रात्री ०९.३० वाजता १० झोपडी सदृश दोन मजल्यांची बांधकामे खचल्याने कोसळली.

            मंत्री श्री.लोढा म्हणाले, या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही मात्र १० बांधकामे कोसळून २० लाख, रूपयांची वित्तहानी झाली आहे तसेच १४ घरांना तडे गेले आहेत. नाल्यालगतच्या उर्वरित झोपड्यांलगतच्या भिंतीचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापन कार्यालयामार्फत (SWM) तातडीने काम सुरू करण्याबाबत के पश्चिम विभाग कार्यालयाने बैठक घ्यावी, असे निर्देश मंत्री श्री.लोढा यांनी दिले.

                यावेळी आमदार पराग अळवणी, आमदार अमीत साटम, स्थानिक नगरसेवक सुनीता राजेश मेहता, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी भेट देऊन पाहणी केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *