

संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्ताने मा. नगरसेविका सौ. सीमाताई राजेंद्र माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मनपाच्या सहकार्याने चेंबुर मधील माहुल म्हाडा वसाहत व मुकुंदनगर म्हाडा वसाहत येथील स्थानिक रहीवाशांच्या सहकार्याने विभागात स्वच्छता मोहीम व कोरोना संसर्गजन्य आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती केली. ह्या कार्यक्रमाची संकल्पना सामाजसेवक राजेंद्र नगराळे यांची होती तर . कार्यक्रमाचे नियोजन सतीशभाऊ आठवले यांनी केले.
गाडगे महाराजांचा विसर आता सर्वांना पडत चालला आहे . परंतु सध्याच्या परिस्थितीत गाडगे बाबांचे कार्य लोकांच्या स्मरणात राहन अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणुनच त्यांची जयती नुसतीच जयंती म्हणून साजरी न करता त्यांचे विचार सर्वसामान्य पर्यत पोहचवणे हे उद्दिष्ट ठेऊन , आपले घर तसेच परीसर स्वच्छ ठेवा ,कचरा कचरापेटीत टाका , ओला कचरा सुका कचरा वेगळा ठेवा , व्यसन करू नका , शिका , प्रशासनाने कोरोना बाबतीत दिलेले निर्बंध पाळा हा संदेश प्रत्येक ईमारती मध्ये जाऊन घोषणा करुन समाजसेवक राजेंद्र नगराळे लोकांमध्ये प्रबोधन केले.