दिलीप वेंगसकर क्रिकेट प्रशिक्षण केंद्र माहुल रोड BPCL गेट समोर चेंबुर मुंबई 400074 या प्रशिक्षण मैदानात वेग वेगळ्या ठिकाणाहून 10 ते 15 वयो गटाचे लहान लहान मुले क्रिकेट प्रशिक्षण घेण्यास येतात.या वेंगसकर क्रिकेट प्रशिक्षण केंद्राच्या बाजूला सिमेंट मिक्शरचे दोन प्लांट बसविले आहे.त्या सिमेंट मिक्शर ने गंभीर रीत्या होणारे प्रकार जसे सिमेंट मिक्शर व क्रिकेट प्रशिक्षण केंद्राला लागून जी झाड झुडपे आहेत.त्यावर सिमेंटचे धुर व त्या सिमेंटचे बारीक घाण कण क्रिकेट प्रशिक्षण मैदानावर हवेच्या दिशेने रोज येत असतात.त्या सिमेंटच्या बारीक कण व घाणी मुळे मैदानाती झाडे झुडपे , मैदानाती गवत, व लहान मुलांना तसेच क्रिकेट प्रशिक्षण देणारे कोच व तेथील कर्मचारी याना रोज त्रास होत आहे.तरी स्थानिक पोलिस, एम.पूर्व चेंबुर विभाग बृह्नमुंबई महानगर पालिका, तसेच त्या विभागातील नगर सेवक,आमदार ,खासदार, व पर्यावरण मंत्री यांनी जातीने लक्ष देऊन या वेंगसकर क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे व लहान मुल आणि गवत झाडा झुडपांचे रक्षण करावे.व त्या सिमेंट मिक्शर बंद करण्यात यावे.
Related Stories
28/09/2023