गोदरेज लॉकिम मोटर्सचे आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत हर्मेटिक कंप्रेसर मोटर्सकडून वर्ष दर वर्ष १०% वाढीचे उद्दिष्ट

0
Image by source


~ भारतातील बाजारपेठेतील अग्रणी आणि स्वतंत्र हर्मेटिक मोटर उत्पादक म्हणून गोदरेज लॉकिम मोटर्सला त्यांच्या उत्पन्नातील ६०% ते ७०% वाटा आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत हर्मेटिक मोटर्स विभागातून मिळण्याची अपेक्षा

मुंबई, १३ मे २०२२: गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या गोदरेज अँड बॉयसची व्यवसाय शाखा असलेल्या गोदरेज लॉकिम मोटर्सने पुढील तीन वर्षांत हर्मेटिक कंप्रेसर मोटर्सकडून वर्ष दर वर्ष १०% वाढीचे उद्दिष्ट ठेवत असल्याची घोषणा केली आहे. विशेष मोटर्स, लॅमिनेशन आणि वैविध्यपूर्ण अॅप्लिकेशन्ससाठीच्या घटकांमध्ये त्याचा वाटा सातत्याने वाढवण्याचेही तिचे उद्दिष्ट आहे. हर्मेटिक कंप्रेसर मोटर्सचा वापर एअर कंडिशनर्स, रेफ्रिजरेटर्स आणि व्यावसायिक रेफ्रिजरेशन सारख्या सुविधांमध्ये केला जातो.

उष्णतेच्या लाटेमुळे मागणीत वाढ होत असताना, एअर कंडिशनर्स आणि रेफ्रिजरेटर्सच्या उत्पादकांनी उत्पादन पूर्ण क्षमतेने वाढवले आहे. कूलिंग उपकरणांमध्ये वापरल्या जाणार्‍या घटकांच्या किंमतीही वाढल्या आहेत आणि येत्या तिमाहीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. ज्या आघाडीच्या कंप्रेसर उत्पादकांना वाढीव क्षमतेची गरज आहे त्यांनी वाढीसाठी आणि अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी गोदरेज लॉकिम मोटर्सशी करार करण्यास सहमती दर्शवली आहे.

भारत स्वतःला ‘रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर’ केंद्र म्हणून प्रस्थापित करत आहे आणि त्यामुळे देशातील कंप्रेसर उत्पादकांची संख्या आणि प्रमाणामध्ये वाढ होत आहे. रेसिप्रोकेटिंगमध्ये आणि मुख्यतः हेवी ड्यूटी व्यावसायिक रेफ्रिजरेशनमध्ये हवा दाबण्यासाठी पिस्टन वापरले जाते. हर्मेटिक मोटर्सचे प्रणेते म्हणून गोदरेज लॉकिम मोटर्स व्यावसायिक, औद्योगिक आणि निवासी उपकरणांसह विविध सुविधा प्रयोगांसाठी ऊर्जा-कार्यक्षम उपाय तयार करते. व्यवसायाने अलीकडेच त्यांच्या मोटर्सचे तंत्रज्ञान सुधारित केले आहे आणि सर्वसाधारण कामासाठी वापरल्या जाणाऱ्या मोटर्ससाठी भारतातील पहिले ई-स्विच तंत्रज्ञान सादर केले आहे.

अपेक्षित वाढीवर भाष्य करताना गोदरेज लॉकिम मोटर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख झेर्सिस मार्कर म्हणाले, “आम्ही भारतातील हर्मेटिक कॉम्प्रेसर मोटर्स बाजारपेठेमध्ये आघाडीवर आहोत. हर्मेटिकली सीलबंद कंप्रेसरची उच्च विश्वासार्हता विश्वसनीय गोदरेज लॉकिम हर्मेटिक आत व्यवस्थितपणे बसवलेल्या मोटर्समुळे येते आणि हे संपूर्ण यंत्रणेच्या केंद्रस्थानी आहे.
कंट्रोलर कार्डसह बीएलडीसी (ब्रशलेस डीसी मोटर्स) तंत्रज्ञान उच्च कार्यक्षमतेच्या गरजांसाठी अंतर्गत विकसित केले गेले असून नजीकच्या भविष्यात याची मागणी देखील वाढेल अशी आमची अपेक्षा आहे. आमच्या ग्राहकांना त्यांच्या स्थानिक आणि निर्यात गरजांसाठी सर्वोत्तम गुणवत्ता प्रदान करताना त्यांची मालकीहक्काची किंमत अधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी आमच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओला सातत्याने आकार देणे याकडे आमचे लक्ष आहे. कूलिंग उपकरणांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे विशेषकरून आत्मनिर्भर उपक्रमांतर्गत सरकारने सुरू केलेल्या पीएलआय योजनेतून भारतातील कंप्रेसर उत्पादक आणि व्हॉल्यूमच्या मागणीत वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत आम्हाला ६० ते ७०% वाढता महसूल हर्मेटिक मोटर्समधून येईल अशी अपेक्षा आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या व्हॉल्यूम आणि मूल्य वाढीसाठी सातत्याने समर्थन देत राहू.”

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *