माथाडी नेते स्व.अण्णासाहेब पाटील सर्वांनाच दीपस्तंभासारखे मार्गदर्शक

0
  • मुख्यमंत्री एकनाथ यांचे
    माथाडी मेळाव्यात गौरवोद्गार
  • image by source.

मुंबई – ज्यांनी आपले संपूर्ण जीवन कष्टकरी जनतेला समर्पित केले आणि आधुनिक महाराष्ट्र घडविण्यासाठी मोलाचे योगदान दिले असे माथाडी नेते स्व.अण्णासाहेब पाटील हे आपल्या सर्वांना दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्व.अण्णासाहेब पाटील यांना आदरांजली अर्पण केली, ते अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत कांदा-बटाटा मार्केट येथे महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्यावतीने आयोजित केलेल्या माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यात बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, अण्णासाहेबांनी कामगारांसाठी अतोनात मेहनत,ऐतिहासिक कायदे निर्माण केले.आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी ग्वाही देतो आमचं सरकार गरीब, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे. प्रसंगी सर्वसामान्य जनतेसाठी कायदा बदलण्याची वेळ आली तरी आम्ही कायदा बदलण्याची वेळ आली तरी आम्ही कायदा बदलणार.
तसेच माथाडींचे नेते नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर अध्यक्ष म्हणून आता पुन्हा घोषित नेमणूक केली जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी आमचे सरकार सकारात्मक निर्णय घ्यायचे माथाडी कामगारांचे अनेक उर्वरित प्रश्न आताही मुख्यमंत्री, मी स्वत: आणि कामगार मंत्री सुरेश खाडे असे तिघे मिळून सोडवू.कामगार मंत्री सुरेश खाडे यावेळी बोलताना म्हणाले कि, मी एक कामगार होतो, मला या चळवळीची माहिती आहे. मी आमच्या सरकारककडून माथाडी कामगारांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहीन.संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील म्हणाले की, माथाडी कामगारांच्या कामात सराईत गुन्हेगारी वाढत चालली असून, खोटे अर्ज करून पैसे घेतात, हप्ते घेतात आणि खंडणी वसूल केली जाते. याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री असताना माथाडी कामगारांसाठी तत्परतेने ज्या योजना राबविल्या, प्रलंबित प्रश्न मार्गी लावले त्याबाबत त्यांचे आभार मानले,माथाडी युनियनचे कार्याध्यक्ष, आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, प्रश्न तेच आहेत,सरकार बदलते,पण प्रश्न सुटत नाहीत,
अण्णासाहेबांचा रुबाब,वजन आणि कामगारांसाठी अहोरात्र काम करण्याची पद्धत यामुळे अनेक प्रश्न त्यावेळी सरकारमार्फत सोडवले जायचे.पण आता तसे घडत नाही.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संघटनेचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप म्हणाले की,आम्ही संघटनेचे सर्व पदाधिकारी अण्णासाहेबांच्या विचार-आचार आणि शिकवणुकीनुसार संघटना पुढे नेण्यासाठी सतत काम करतो.त्यामुळे त्यांच्या विचाराची ही संघटना एकजूट व अधिक बलाढ्य करून त्यांच्या ऐतिहासिक कार्याचे जतन करावे हीच अण्णासाहेबांच्या आजच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली ठरेल.

या मेळाव्याचे सूत्रसंचालन युनियनचे संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख यांनी केले.या मेळाव्यास आमदार मंदाताई म्हात्रे, माजी आमदार कृपाशंकर सिंह,आमदार शिवेंद्रराजे भोसले,आ.महेश शिंदे,आ.प्रवीण दरेकर, आ.निरंजन डावखरे,माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी आमदार विजय सावंत, माजी महापौर सागर नाईक,सातारा जि. प माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, बाजार समितीचे सभापती अशोक डक, सचिव संदीप देशमुख, माथाडी हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. हणमंतराव पाटील, माजी नगरसेविका शुभांगी पाटील, शशिकला पाटील, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरात, माजी नगरसेवक रवींद्र इथापे,माथाडी पतपेढीचे व्यवस्थाकीय संचालक रमेश पाटील, माथाडी युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, ऋषिकांत शिंदे,आनंद पाटील,उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, युनियनचे कायदेशीर सल्लागार भारती पाटील आणि माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *