विश्व हिंदू परिषद सोबत समस्त वारकरी संप्रदाया तर्फे राज्यात तीव्र भजनी आंदोलन

0

विश्व हिंदू परिषद – मुंबई

मुंबई, दि. १७ जुलै – पंढरपूरच्या वारीला विरोध करत साधू संताचा अपमान करण्यार्या महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी, विश्व हिंदू परिषदेसोबत संपूर्ण वारकरी समाज आज रस्त्यावर उरला होता. संपूर्ण महाराष्ट्रात १५४ ठिकाणी भजनी आंदोलन करण्यात आले. वारीला विरोध, वारकर्‍यांना अटक करत त्यांच्यावर केले जाणारे अत्याचार, भागवत धर्माच्या पताकेचा अपमान व जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना केलेल्या नजरकैद इत्यादी घटनांचा या वेळी भजनी आंदोलन करत निषेध करण्यात आला.

कोविडचे सर्व नियम पाळत भजने म्हणत शांतता पूर्वक निषेध करणाऱ्या वारकर्‍यांना या वेळी “तुमच्या देवाचे नाव घ्यायला किंवा भजन म्हणण्यास करण्यासाठी परमिशन नाही” असे पोलिसांद्वारे सांगण्यात आले, पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलन करणाऱ्या वारकरी संतांना ताब्यात घेतले. यावेळी पत्रकारांना वृत्तांकन करण्यापासून थांबवण्यात आले. सरकार आस्मानी संकटांचा फायदा घेत पोलीस प्रशासनाच्या बळाच्या मदतीने हिंदू साधू-संतांवर सुलतानी अत्याचार करत आहे हे पुन्हा स्पष्ट झाले.

हिंदुत्वाचा वापर करून मते पदरात पडून घेत, जनमताचा अनादर करून, साधू संतांची व समस्त हिंदू समाजाची संविधानाने दिलेलेया हिंदूंच्या उपासनेच्या अधिकाराची पायमल्ली करणारे हे फसवे सरकार आहे. भोळ्या भाबड्या वारकऱ्यासोबत चर्चेचे ढोंग करत त्यांना मूर्ख बनवणाऱ्या ह्या सरकारच्या कुठल्याही सर्व्हेवर या पुढे आम्ही अजिबात विश्वास ठेवणार नाही. चंद्रभागेच्या वाळवंटी भक्तांच्या भेटीसाठी तात्कळत उभ्या असेल्या विठूमाउलीचा व त्याच्या भक्तांचा खुले आम अपमान करण्यात येत आहे. या विरुद्ध आम्ही शांतपणे भजनी आंदोलन करत आमचा निषेध ही व्यक्त करायचा नाही का? स्वतंत्र भारतात घटनेद्वारे प्राप्त झालेला उपासनेचा अधिकार हा त्या आधी मुघलांच्या व इंग्रजांच्या शासनात ही अबाधित होता. सरकारच्या या दडपशाहीचे उत्तर संत समाज येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात पंढरपूर पॅटर्न राबवून देईल. अशा संतप्त भावना आंदोलनात सहभागी झालेल्या वारकरी, साधू संतांनी यावेळी व्यक्त केल्या.

विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना ज्ञापन देत वारकर्‍यांनी आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचवल्या.
• जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना व जागोजागी अडवणूक केलेल्या सर्व वारकर्‍यांना सन्मानपूर्वक मुक्त करावे. त्यांच्यावर लावलेले सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावे.
• आषाढी एकादशी पासून महाराष्ट्रात विविध भागात विविध मठांमध्ये चालणारे चातुर्मास सेवा व मंदिरातील पारंपारिक उत्सव, वारकरी सप्ताह, कीर्तने- प्रवचने, दर्शन या वरील प्रतिबंध दूर करून. ५० % उपस्थिती प्रमाणे सर्व अनुष्ठानांना अनुमती द्यावी.
• मा. मुख्यमंत्र्यांनी वारकर्‍यांची तत्काळ माफी मागावी.
• तसेच या सर्व प्रकरणाची नैतिक जवाबदारी स्वीकारून मा. मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात सरकारी पूजेसाठी येऊ नये.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *