


मुलुंड, ( राजि.) ह्या ट्रस्ट च्या वतीने समाजाच्या फक्त सभासद असलेल्या समाज बंधू भगिनिंचे ” स्नेहसंमेलन वजा एक दिवसीय सहलीचे आयोजन” रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी, निर्मल फार्म हाऊस, बदलापूर येथे आयोजित करण्यात आले होते,
सगळ्या मुलुंडमधील संस्थेच्या बऱ्याच सभासद ज्ञाती बंधू भगिनींनी १२जानेवारी २०२५ च्या “स्नेहसंमेलन / सहल ” ह्या प्रायोगिक उपक्रमास सहभागी होऊन भरभरून सहकार केला आहे ,त्या बद्दल सगळ्या सहभागी बंधू भगिनींचे आभार संस्थेचे खजिनदार श्री. निखीलचंद्र गडकरी यांनी मानले, नियोजित कार्यक्रम वेळेत संपन्न झाला, सगळ्या सहल सहभागी बंधुभागिनी आनंद घेतला तसेच सुग्रास भोजन,सुखद प्रवास तसेच मनोरंजन, खेळ आणि मनःसोक्त भटकंतीचा पण आनंद घेतला, असे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजुन्नती मंडळ मुलुंड, ( राजि.) ह्या ट्रस्टचे अध्यक्ष, श्री. चंद्रशेखर मधूकर देशमुख असे सांगितले. हे स्नेहसंमेलन/ सहल यशस्वी करण्यासाठी श्री. ओंकार गुप्ते, श्री.प्रशांत गुप्ते, डॉ. सुरुची प्रधान, श्री. मुकुंद वढावकर , सौ. नेहा फडणीस, उपाध्यक्ष, श्रीमती गौरी गुप्ते आणि इतर संस्थेच्या कार्यकारणी सदस्यांनी खूप मेहेनत घेतली असे संस्थेचे कार्यवाह, श्री. केतन गुप्ते यांनी कळविले आहे.